पाचोडला पोलिसांसमोर दोन गटांत हाणामारी; २३ जणांवर गुन्हा दाखल

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : तालुक्यातील पाचोड येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच दोन गटांत शिवीगाळ व हाणामारीचा प्रकार घडला. दोन्ही गटांतील २३ जणांवर दंगल व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोड येथील एका हॉटेलसमोर ही घटना घडली. दोन गटांत वादावादी झाली. नंतर मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळ सुरू झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांचा गोंधळ सुरू असताना पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. हे विशेष. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना सार्वजनिक शांतता अनिकेत भंग केल्यामुळे पोलीस अंमलदार नागनाथ केंद्रे यांनी फिर्याद दिली. 

या प्रकरणी बाळू भालसिंगे, किशोर भालसिंगे, भालसिंगे, अमोल भालसिंगे, शुभम ऊर्फ गजू भालसिंगे, मुरली भालसिंगे, गणेश ऊर्फ गोविंद कडूबाळ गवारे, भागवत बापूराव भुमरे, ओम संतोष भुमरे, अभिषेक ऊर्फ चिलट्या वसंत बंडू जाधव, अजय डुकले, अजय डुकले, नितीन डुकले व अजय भुमरेसह इतर ८ ते ९ अज्ञात लोकांविरुद्ध पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल आहे.